जेवणासाठी 100 रुपये दिले नाही म्हणून दोघांची दगडाने ठेचून हत्या

April 21, 2016 6:12 PM0 commentsViews:

नागपूर – 21 एप्रिल : जेवण करायला 100 रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरूने दोन जणांचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नागपूरच्या वाडी परिसरात घडली आहे. ज्ञानेश्नर राठोड असं 24 वर्षीय आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.kolhapur crime

नागपूरच्या वाडी परिसरात सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर नागपूर पोलिसांनी ज्ञानेश्वर राठोड या व्यक्तीनेच या दोन जणांचा खून केल्याचा उघड झालं आहे. बुधवारी रात्री जेवण करण्यासाठी ज्ञानेश्वरने रस्त्यावर उभ्या असलेल्या श्याम खाडे आणि ओम गिरी या दोन जणांना जेवण करण्यासाठी 100 रुपये मागितले होते. या दोघांनी ज्ञानेश्वरला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने या दोघांचाही दगडाने ठेचून खून केला. नागपुरातील गेल्या 48 तासांतील शुल्लक कारणावरून खून झाल्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये वाढलेल्या हत्यांच्या घटना बघता नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा