दुष्काळाला ऊस शेती जबाबदार नाही -शरद पवार

April 21, 2016 7:39 PM0 commentsViews:

21 एप्रिल : मराठवाड्यात गेली 20 वर्षं ऊसशेती, साखर कारखानदारी सुरू आहे पण मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीला ही ऊस शेती आणि साखर कारखानदारी जबाबदार आहे, असा निष्कर्ष काढायला मी काही जलतज्ञ राजेंद्रसिंह नाही अशा शब्दात जेष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दुष्काळाला साखर कारखाने आणि ऊस लागवड जबाबदार आहे अशी टीका करणार्‍यांचा समाचार घेतला.pawar on amir3

पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यासाठी राज्यातील सहकारी आणि खाजगी कारखानदारांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात प्रत्येक कारखाना 10 लाख मदत करेल असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, हे पैसे जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्यात येतील.

सरकार याबाबत जीआरही काढणार आहे. या बैठकीला उपस्थित असलेले सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणात बोलताना केंद्र सरकार शरद पवार यांना विचारल्याशिवाय साखरेबाबत कोणताही निर्णय घेत नाही.

इतकंच नाही तर पवार यांचा सल्ला घेणारे पंतप्रधान मोदी यांनी शेतीतील सर्व काही समजणार्‍या पवार यांच्याशी चर्चा करावी अशा सूचना अधिकार्‍यांनाही दिल्याचं सांगितलं. या बैठकीला सहकारी आणि खाजगी कारखान्यांचे प्रतिनिधी हजर होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा