राज ठाकरेंना दोन प्रकरणात जामीन मंजूर

April 21, 2016 8:09 PM0 commentsViews:

Raj thackray3123उस्मानाबाद – 21 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दुष्काळ दौर्‍यावर आहेत. मात्र, त्यांचा हा दुष्काळ दौरा आहे की, कोर्टवारी असा प्रश्न उपस्थित झालाय. आज (गुरुवारी) राज ठाकरे सार्वजनिक मालमत्ता नुकसान केल्याच्या 2 प्रकरणात उस्मानाबाद न्यायालयात हजर झाले. या दोन्ही प्रकरणी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि 2500 रुपये दंड भरून जामीन मिळाला.

राज ठाकरे यांनी आज दुष्काळ दौर्‍याच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात सोलापूर शहरातील बोअरवेलच्या उद्घाटनाने केली. त्यांनंतर त्यांनी परांडा येथील न्यायालयात हजेरी लावून आपला जामीन मिळवला.

उस्मानाबाद शहरातील 21 ऑक्टोबर 2008 मधील बस तोडफोडीच्या 2 प्रकरणात चिथावणी दिल्याच्या आरोपावरून उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल होता. यातील एका प्रकरणात तालुका न्यायालयाने वॉरंट काढले होते. यात अडीच हजार रुपयाच्या दंड आणि 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पुरातन विहिरींचा गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा