आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

April 21, 2016 8:29 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 21 एप्रिल : आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमच्या सरकारातही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

sule_on_cmराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर आहे. आज औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मराठवाड्याची परिस्थिती भीषण आहे. पाणी टंचाई, चारा छावण्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न आहे.

पण, आमचे सरकार होते तेव्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या व्हायच्या. तेव्हा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारवर 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार आहे आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतायत मग कुणावर गुन्हा दाखल करायचा ? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे यांनी आज मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍याला औरंगाबादहून सुरुवात केली. औरंगाबादहून त्यानी जालना, बीड या जिल्ह्यातील शेतकयांशी संवाद साधला, चारा छावण्याची पाहणी केली. विशेषकरून त्यांनी दुष्काळी भागातील महिलांचे प्रश्न जाणून घेतले. उद्या त्या लातूरमध्ये असतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा