पवारांचा आवाहनानंतर साखर कारखाने करणार दुष्काळग्रस्ताना 10 लाखांची मदत

April 21, 2016 8:59 PM0 commentsViews:

 sugar_cane21 एप्रिल : मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी साखर कारखानेही सरसावले आहेत. प्रत्येक साखर कारखान्यानं 10 लाखांची मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्याला सर्व साखर कारखान्यांनी पाठिंबा दिला आहे.

पुण्याच्या साखर परिषदेत शरद पवार यांनी साखर कारखान्यांना दुष्काळी भागासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनांला साखर कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. प्रत्येक साखर कारखाना 10 लाखांची मदत करणार आहे. त्याशिवाय आपापल्या कार्यक्षेत्रासाठी 15 लाखांची मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मदत जलसंधारणासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 25 लाख रुपयांची मदत साखर कारखाने करणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा