वसई लाठीमाराची चर्चा

March 23, 2010 12:37 PM0 commentsViews: 4

23 मार्च वसईत झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत आज चर्चा झाली. यावेळी आमदार विवेक पंडित यांनी वसईत झालेल्या लाठी हल्ल्यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तसेच महापालिकेतून 49 गावे वगळण्याचा ग्रामसभांचा निर्णय असताना ही गावे का वगळली जात नाहीत, असाप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी पंडित यांच्या मागण्यांना सर्वच पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. तर लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही यावेळी काही जणांनी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण गुरूवारी उत्तर देणार आहेत.

close