भुजबळांना मदत केल्याच्या आरोपावरून डॉ. घुलेंची हकालपट्टी

April 22, 2016 1:19 PM0 commentsViews:

dr. ghule

मुंबई – 21 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मदत केल्याच्या आरोपावरून आर्थर रोड जेल प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल घुले यांची हकालपट्टी केली आहे. भुजबळ यांना दोन दिवसांपूवच् सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भुजबळ यांना दातदुखीची तक्रार होती. पण त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यात तुरुंगाचे डॉ. राहुल घुले दोषी आढळून आले.

केवळ दात दुखत असतानाही भुजबळांना सेंट जॉर्ज रूग्णालयात का दाखल करण्यात आलं, असा सवालही डॉ. घुले यांना विचारण्यात आला आहे. तसंच डॉ. घुले यांनी छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय कागदपत्रांत फेरफार करून बदल केल्याचा आरोप देखील डॉ. घुले यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची जेल प्रशासनाने कारागृहातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, डॉ. घुलेंनी मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. जेल प्रशासनावर मी भ्रष्टाचाराचे आरोरप केल्यामुळेच आकसापोटी ही कारवाई करण्यात आलीय. असा आरोप डॉ. घुलेंनी केला आहे.

याबाबत IBN लोकमतनं काही सवाल उपस्थित केले आहेत…

1) आर्थर रोड जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांच्यावरील निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे का ?

2) डॉ. घुलेंनी जेल प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळेच त्यांचं निलंबन झालंय का ?

3) शासन नियुक्त वैद्यकीय अधिकार्‍याला तडकाफडकी निलंबित करण्याचे अधिकार जेल प्रशासनाला आहेत का ?

4) डॉ. घुले यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची गृहविभागाकडून निष्पक्ष चौकशी होणार का ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा