मायनिंगविरोधात लढा

March 23, 2010 12:43 PM0 commentsViews: 2

23 मार्चकळणेवासियांच्या आंदोलनानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल वासियांनीही मायनिंगविरोधात लढा पुकारला आहे. काजू बागायतीवर महाराष्ट्रापेक्षाही जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या या गावात टाटा मेटॅलीक कंपनीने मायनिंग सुरू करायचे ठरवले आहे.याबद्दलची जनसुनावणी येत्या 12 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जनसुनावणीत कायदेशीर युक्तीवाद करून ग्रामस्थांकडून मायनिंगला विरोध करण्यात येणार आहे.याची पूर्वतयारी म्हणून डोंगरपालच्या डोंगरांमध्ये वनभोजनाचे कार्यक्रम करून लोकांना संघटीत करण्याचे काम सुरू झाले आहे.

close