उत्तराखंड प्रकरणाने देशाची प्रतिमा खराब, उद्धव ठाकरेंचा केंद्राला घरचा अहेर

April 22, 2016 2:41 PM0 commentsViews:

Uddhav2312

पुणे – 22  एप्रिल : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. या प्रकरणात न्यायालयाचा अवामान किंवा राष्ट्रपतींचा अवमान एवढ्याच गोष्टी नाही, तर देशाची प्रतिमा यामुळे खराब होते अशी टीका ठाकरे यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने उध्दव ठाकरे आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते. पुण्यात गरवारे बालभवना शेजारील जागेत हे कलादालन साकारण्यात आला आहे. बाळ ठाकरे यांची निवडक व्यंगचित्रे, 70 आसनी क्षमतेचे सभागृह, नवोदित कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाकरता आर्ट गॅलरी, पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणांच्या छायाचित्रांचं दालन अशी या कलादलाची वैशिष्ट्ये आहेत. याच कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला कानपिचक्या दिल्या आहे.

राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाचा असा दुरुपयोग करणार्‍यांनी याचं भान ठेवलं पाहिजे होतं, हे करण्याची खरं तर काही गरज नव्हती, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला सुनावलं आहे. सत्तेसाठी एवढी घिसडघाई कशाला पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेसाठी चांगल्या कामाची गरज आहे. जर चांगलं काम केलं तर जनता सत्ता देते याची आठवणही त्यांनी करुन दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा