मुंबईत मुलीवर सामूहिक बलात्कार

March 23, 2010 1:09 PM0 commentsViews: 3

23 मार्चएका 12 वर्षांच्या मुलीवर 9 जणांनी दीड वर्षापर्यंत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. साकीनाका भागात हा भयानक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर पाच आरोपी फरार आहेत.अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका 71 वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे. या व्यक्तीनेही आपल्यावर बलात्कारकेल्याचे या मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सांगितले आहे. आई वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आईने दुसरे लग्न केले, म्हणून या मुलीला घाटकोपरमध्ये मावशीकडे ठेवण्यात आले. पण मावशीच्या मुलानेच तिच्यावर घरात बलात्कार केला. त्यानंतर इतर मित्रांच्या मदतीने त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.तसेच तिचे शूटिंग करुन इतरांना दाखवण्याची तिला धमकी दिली. तसेच हा प्रकार कोणालाही न सांगण्याचीधमकी तिला दिली. पण अखेर अत्याचार सहन न झाल्याने या मुलीने आपल्या काकाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिला गुजरातमध्ये भूज इथे नेण्यात आले. पण तिथेही एका आरोपीने तिला फोन करुन धमकावल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या या मुलीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

close