गाडी चालवण्याचा मोह जीवावर बेतला, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

April 22, 2016 4:52 PM0 commentsViews:

मुंबई – 22 एप्रिल : कार शिकण्याचा मोह एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतलाय. त्याच्या या हट्टामुळे ड्रायव्हरचाही मृत्यू झालाय. मुंबई सेट्रलमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा ड्रायव्हरसह कार पार्किंगच्या लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीये.mumbai_car33

घडलेली हकीकत अशी की, मुंबई सेंट्रल इथल्या 22 मजली इक्बाल हाईटस या इमारतीत ही घटना घडली. हाफीज पटेल आणि गाडीचा ड्रायव्हर मोहम्मद जावेद हे काही कामासाठी कार घेऊन बाहेर पडले होते, परत आले तेव्हा हाफीजनं कार पार्किंगपर्यंत कार चालवत नेली. हाफीज पटेल हा 14 वर्षांचा मुलगा ड्रायव्हरबरोबर गाडीत बसला होता. गाडी फक्त पार्क करायची आहे. मी करतो, असं हा अल्ववयीन मुलगा म्हणाला. ड्रायव्हरनं होकार दिला. रिव्हर्स घेताना हाफिजनं ब्रेकऐवजी एक्सीलरेटरवर पाय दिला. गाडी ताशी 80 किलोमीटरच्या वेगानं लिफ्टला धडकली. लिफ्टचं दार उघडलं आणि गाडी 2 मजले खाली पडले. कार लिफ्ट त्यांच्या कारवर पडल्यानं कार तशीच खाली दाबली गेली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. तब्बल सहा तासांनतर ही घटना उघडकीला आली. शोधाशोध सुरू केल्यानंतर काही वेळापूर्वी एक मोठा आवाज झाल्याचं वॉचमननं सांगितलं आणि ही घटना उघडकीला आली. पण तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा