हाती सत्ता नाहीये मग, दुष्काळग्रस्तांना भेटून काय आश्वासन देऊ ?- राज ठाकरे

April 22, 2016 5:10 PM0 commentsViews:

22 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौर्‍यावर आहेत की कोर्टवारीवर असा प्रश्न उपस्थिती झाला होता. याबद्दल आता खुद्ध राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं असून हा माझा दुष्काळ दौरा नाही असं सांगितलं. माझ्या हातात सत्ता नाही, मी दुष्काळग्रस्तांना भेटून काय आश्वासन देणार असंही राज ठाकरे म्हणाले.

raj2311मनसेच्या भव्य मेळाव्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौर्‍यावर रवाना झाले. त्याचा हा दुष्काळी दौरा असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. पण पहिल्या दिवसांपासून राज ठाकरे वेगवेगळ्या कोर्टात हजर झाले.

सार्वजनिक मालमत्ता तोडफोड प्रकरणी लातूर, परांडा आणि उस्मानाबादमध्ये राज ठाकरेंविरोधात खटला सुरू होता. या प्रकरणी राज ठाकरे स्वत: हजर राहुन जातमुचलक्यावर जामीन मिळवला. त्यामुळे राज ठाकरेंचा हा दुष्काळ दौरा की कोर्टवारी असा प्रश्न निर्माण झाला होता.

पण, माझा दौरा हा दुष्काळी दौरा नसून न्यायालयीन केसेस संदर्भात मी इथं आलो असल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केलाय. तसंच ज्यांना दौर्‍यावर जायचं ते जात नाही. एकतर माझ्या हातात सत्ता नाही, मी दौरा जरी केला तरी दुष्काळग्रस्तांना काय सांगू, काय आश्वासन देऊ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण, या दौर्‍यात ते मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचीही पाहणी करणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा