शरद पवार-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

April 22, 2016 5:38 PM0 commentsViews:

पुणे – 22 एप्रिल : एकमेकांवर एकही टीकेची संधी न सोडणारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

pawar_and_uddhavपुण्यात गरवारे बालभवना शेजारील जागेत हे कलादालन साकारण्यात आलंय. बाळ ठाकरे यांची निवडक व्यंगचित्रे ,70 आसनी क्षमतेचे सभागृह,नवोदित कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाकरता आर्ट गॅलरी,पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणांच्या छायाचित्रांचं दालन अशी या कलादलाची वैशिष्ट्ये आहेत. यावेळी उद्धव आणि शरद पवार, दोघांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब ठाकरे हे एक राजकारण तर होतेच पण ते आंतराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार होते. त्यांचं एक व्यंगचित्र 100 अग्रलेखांची बरोबरी करायचंय. त्यांच्या कुचल्यातून सर्वसामान्याच्या प्रश्नांचा निपटारा केला जायचा अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा