उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम

April 22, 2016 6:15 PM0 commentsViews:

Supreme court of india22 एप्रिल : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे. नैनिताल हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये आता राष्ट्रपती शासन कायम राहणार आहे. याबद्दल पुढची सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.

शासकीय यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करत मोदी सरकारने उत्तराखंडमध्ये 27 मार्च रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार यासंदर्भातील जाहीर घोषणेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केलीये. या प्रकरणी नैनिताल हायकोर्टाने काल 21 एप्रिल रोजी मोदी सरकारला दणका देत राष्ट्रपती राजवट रद्द केली होती. या निर्णायला आव्हान देत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दिलासा देत राष्ट्रपती राजवट कायम ठेवलीये. राष्ट्रपती राजवट कायम राहिल्यामुळे आता काँग्रेसच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा