नगरसेवकांचे स्वप्न भंगले

March 23, 2010 1:13 PM0 commentsViews: 3

23 मार्च नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आरक्षणात वॉर्ड गायब झाल्याने आणि पक्षाने तिकिट नाकारल्याने तब्बल 39 नगरसेवकांचे महापालिकेत पुन्हा जाण्याचे स्वप्न भंगले आहे. यामध्ये महापौर अंजनी भोईर, माजी महापौर मनिषा भोईर आणि अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश आहे. बहुतांश नगरसेवकांनी स्वत:च्या पत्नी किंवा इतर नातेवाईकांना उमेदवारी मिळवून देऊन नगरसेवकपद घरात राहील याची दक्षता घेतली आहे. नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच बंडखोरी वाढली आहे. याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना बसण्याची शक्यता आहे.

close