मुंबई पोलिसांनाच लुटणार चोर अखेर गजाआड

April 22, 2016 8:56 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई – 22 एप्रिल : मुंबई पोलिसांचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी अंडरवर्ल्डचा खात्मा केला..अतिरेक्यांशी दोन हात केलेत.अनेक गुन्ह्यांचा छडा लावलाय.. पण याच मुंबई पोलिसांना एका भामट्याने लीलया फसवलंय. होय, चोराने पोलिसांकडेच चोरी केल्याची घटना घडलीये. कोण आहे हा चतुर चोर? याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..mumbai_police333

“मी, डीसीपी सायबर सेल बोलतोय मी एका सिक्रेट ऑपरेशनवर आहे. मला पैशांची आवश्यकता आहे माझ्या ऑनलाईन वॉलेटमध्ये 10 हजार टाकून द्या” एका बड्या अधिकार्‍याने कनिष्ठ अधिकार्‍यांना त्याच्या ऑनलाईन वॉलेटमध्ये पैसे टाकायला सांगितलँ. तर ते नकार देऊ शकत नाहीत. त्यातही गोपनीय कारवाईचं सबब पुढे केलं तर कुणी प्रश्नही विचारत नाही. पण, असे फोन करणारा माणूस डीसीपी नव्हता.. तो होता एक चतुर चोर..पण, पोलिसांनाच लुटणार्‍या या चोराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं.

या सायबर चोराची एक गँग आहे. ती एक शहर निवडून तिथल्या मोठ्या अधिकार्‍यांचे नाव आणि नंबर गोळा करायची. ही सर्व माहिती गोळा झाल्यानंतर इंटरनेटवरून कॉल्स करून पोलिसांना फसवायची.

या गँगने पूर्ण देशातल्या 100 पेक्षा जास्त पोलिसांना अशा पद्धतीने फसवलं असल्याचा अंदाज आहे. त्याला अटक झाली असून आता
पोलीस या गँगमध्ये अजून किती लोक आहेत याचा शोध घेतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा