महापालिकांचे कर्मचारी जाणार संपावर

March 23, 2010 1:17 PM0 commentsViews: 2

23 मार्च 'ड' वर्ग महापालिकांची जकात रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील 16 महापालिकांतील कर्मचारी 28 मार्च म्हणजेच रविवारी रात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जकात रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिल 2010 पासून होणार आहे. म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मूठभर व्यापारी आणि उद्योगपतींच्या हितासाठी राज्य सरकार जकात रद्द करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जकात रद्द करुन सरकार 900 कोटींचा बोजा स्वत:वर ओढवून घेत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

close