पुण्यातील संमेलनासाठी दुसर्‍या प्रायोजकांचा पुढाकार

March 23, 2010 1:30 PM0 commentsViews: 2

23 मार्चपुण्यातील साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व घेण्यासाठी आता मुंबईच्या व्हॅल्युएबल ग्रुपने पुढाकार घेतला आहे. संमेलनासाठी गुटखा आणि तंबाखू उत्पदकांचा पैसा नाकारावा, असे डॉ. अभय बंग यांनी आयोजकांना आवाहन केले होते. त्यावर बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. आणि रात्री उशिरा माणिकचंद उद्योग समुहाने आपले प्रायोजकत्व मागे घेतले. त्यानंतर आता या ग्रुपने प्रायोजकत्वासाठी पुढाकार घेतला आहे.कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंतग महोत्सव, लेखक तुमच्या भेटीला, ग्रंथदिंडी अशा अनेक कार्यक्रमांमध्ये पुणेकर उत्साहाने सहभागी झाले.

close