नवी मुंबई स्पोर्टस क्लबचा मेंबरशीपवर सिडकोच्या अधिकार्‍यांचा डल्ला

April 23, 2016 2:07 PM0 commentsViews:

नवी मुंबई – 23 एप्रिल : देशात नावाजला जाणारा नवी मुंबईतील नवी मुंबई स्पोर्टस क्लबचा मेंबरशीपचा घोटाळा समोर आलाय. सिडकोच्या अखित्यारित य़ेणार्‍या या क्लबला मागील दीड वर्षांपासून सिडकोकडून काही परवानग्या देण्याच्या बदल्यात सिडकोच्या 100 अधिकार्‍यांना 12 करोड रूपयांची मेंबरशीप फक्त सव्वा करोड रूपयांना देण्यात आली.

navi_mumbai4333एनएमएसए क्लबची सर्वसामान्य नागरिकांना लाईफ मेंबरशीपसाठी 20 लाख रूपये भरावे लागतात. मात्र सिडको अधिकार्‍यांसाठी ती फक्त 50 हजारांत देण्यात आलीय तर 5 लाख रूपयाची जनरल मेंबरशीप 25 हजारात देण्यात आली आहे. तत्कालीन सिडको एमडी संजय भाटीया यांनी क्लबला पत्र लिहून क्लबला दिलेल्या नाममाञ दराने जमिनीच्या मोबदल्यात या मेंबरशीप याच रक्कमेत दिल्याच पाहिजेत असं दिलं होतं. सिडकोशी पंगा नको म्हणून या मेंबरशीप देण्यात आल्या, माञ, सिडको ब्लँकमेलिंग करत असल्याचा आरोप क्लबने केलाय. या मेंबरशीप नाही दिल्या तर 2017 मध्ये होणार्या फिफा वर्ल्ड कपची एनओसी सिडको देणार नाही. अशी भिती ही क्लबला आहे.

यांनी मागितली मेंबरशीप

निलेश तांडेल, अध्यक्ष, एम्प्लॉइज युनियन
प्रदीप जोशी, विधी अधिकारी
रमेश डेंगळे, सीनिअर प्लँनर
टी एल परब, पर्सनल मँनेजर
पी सुरेश बाबू, मार्केटिंग मँनेजर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा