कंगनाने ‘त्या’ मेलमध्ये दिली ह्रतिकच्या प्रेमात पडल्याची कबुली

April 23, 2016 3:23 PM0 commentsViews:

विराज मुळे, मुंबई – 23 एप्रिल : बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. एकिकडे कंगनाने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून हृतिकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे हृतिकने कंगनाने लिहिलेले इमेल्स पोलिसांच्या हाती स्वाधीन केले आहेत. हेच इमेल आता लीक झाल्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळालीये.

kangana_vs_hrithik roshanक्रिश थ्री या सिनेमाच्या निमित्ताने कंगना राणावत आणि हृतिक रोशन हे पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आले. या सिनेमातील कायाच्या निगेटीव्ह रोलसाठी कंगनाला या सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. हृतिक आणि कंगनावर सिनेमात एक रोमँटीक गाणंही शूट करण्यात आलं आणि ऑनस्क्रिन रोमान्स करता करता त्यांच्या ऑफस्क्रिन रोमान्सचीही चर्चा सुरू झाली.

सुरूवातीला या दोघांनीही या चर्चांसाठी मीडियाला जबाबदार धरलं.आणि हृतिकच्या सुझॉनसोबतच्या घटस्फोटानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलं. एकमेकांविरूद्ध ट्विटरवरून केलेल्या वक्तव्यांमुळे हृतिक आणि कंगनामध्ये वादाची ठिणगी पडली. आणि पहाता पहाता या ठिणगीचा वणवा झाला.

कंगनाने हृतिक आपल्याला विनाकारण बदनाम करत असल्यामुळे त्याला अटक करावी अशा मागणीचं एक पत्र पोलिसांना लिहिलं आणि त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. अखेर हृतिकनेही कंगनाला लिहिलेले मेल पोलिसांना दिले आणि आपलं म्हणणं खरं असल्याचा दावा केला. हेच मेल आता लीक झालेत आणि त्यातून खळबळजनक बाबी समोर आल्यात. यातल्या एकाही मेलला आपण कधीही उत्तर दिलं नसल्याचा दावा हृतिकने केलाय.

कंगनाने 17 ऑगस्ट 2014 ला हृतिकला पाठवलेल्या मेलमध्ये अलं लिहिलंय की, “कधी कधी मला सगळंच जग फार तकलादू आहे असं वाटतं…आपल्यातलं प्रेम तरी खरं आहे का…का तेही नुसतं काल्पनिक आहे..जर एखाद्या दिवशी मी तुला भेटले आणि तू मला ओळखच दाखवणं बंद केलंस…प्रेम करणंही सोडून दिलंस तर मी काय करायचं..त्यानंतर मी कधी स्वतःला सावरू शकेन का..?”

3 सप्टेंबर 2014 ला कंगनाने हृतिकला पाठवलेल्या मेलमध्ये असं म्हंटलंय की, “प्रत्येक दिवशी उत्तर मिळण्याची अपेक्षा न ठेवता हे असे मेल पाठवत रहाणं हे खरंच खूप अवघड आहे.”kangana_hritik3

4 ऑक्टोबरला तीने लिहिलेल्या मेलमध्ये म्हंटलंय की, “प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर मी सगळ्यात आधी तुझं नाव गुगल करते.
एखादा नवा फोटो, व्हिडिओ किंवा इंटरव्ह्यू आलाय का ते पहाते. आशा आहे की, एक दिवस हे रूटीन नक्की बदलेल आणि मला प्रत्यक्ष तुला फोन करून तुझा आवाज ऐकता येईल.”

9 ऑक्टोबरला तीने पुन्हा एक मेल पाठवलाय त्यात तीने म्हंटलंय की, “खरंच खूप बरं वाटलं की तू फोन उचचला नाहीस. काय बरं बोलले असते मी तुझ्याशी तुला ते कसं वाटलं असतं. तुला हाय तरी कसं म्हंटलं असतं मी…मला खरोखर हिस्टेरिया झालाय असं वाटतंय.”

57kangna82 नोव्हेंबरला पाठवलेल्या मेलमध्ये तीने लिहिलंय की, “मला खरंच वाटत नाहीये की मी आज तुला भेटले..तू फारच सेक्सी दिसत होतास…मी फारच नर्व्हस फील करत होते…जेंव्हा मी एकटी असते तेंव्हा मी संपूर्णपणे वेगळी असते मात्र जेंव्हा तू माझ्यासमोर असतोस तेंव्हा मी एखाद्या लहान मुलीप्रमाणे वागायला लागते…मला खरंच हे फिलिंग फार आवडतं..त्या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहतीये जेव्हा तू मला जवळ घेशील आणि मला किस करशील मला खात्री आहे मी नक्की बेशुद्ध पडेन…”

मेलचा सिलसिला इथंच थांबला नाही. त्यानंतर 13 नोव्हेंबर च्या मेलमध्ये कंगनाने लिहिलं की, “तु तुझं घर नक्की कधी बदलणारेस…जेंव्हा तुझं किचन रेडी होईल तेंव्हा ते मी नीट लावेन. हे काम दुसर्‍या कुणी करावं असं मला अजिबात वाटत नाही…तुला कुणी स्टाफ हवा असेल तर मी त्यांची मुलाखतही घेईन…तुझ्या स्टाफला तुझ्या गरजेनुसार ट्रेनिंग देईन…”

हे सारे मेल हृतिकने पोलिसांच्या हवाली केलेत. त्यासोबतच कंगना ही ऍस्परजर ह्या मनोविकाराने त्रस्त असल्याचं म्हंटलंय.आणि त्याची कबुली खुद्द कंगनानेच त्याला पाठवलेल्या मेलमध्ये दिलीय..

kangana ranaut hrithik22 ऑगस्ट 2014 ला कंगनाने हृतिकला पाठवलेल्या मेलमध्ये तीने असं लिहिलंय की,” मला ऍस्परजर सिंड्रीम झालाय असं मला वाटायला लागलंय…माझ्यात त्याची 98 टक्के लक्षणं तरी दिसतायत…माझ्या बाबतीत घडणार्‍या अनेक गोष्टी नॉर्मल नाहीत…या रोगात अनेकदा तुम्ही काल्पनिक नाती निर्माण करता…त्यामुळेच तर मी तुला म्हणाले होते ना की मी आजकाल तुझ्यासोबतच रहातेय म्हणून..”.

हे मेल काही वृत्तपत्रांमधून लीक झाल्यामुळे एकच खळबळ माजलीय. हृतिक आणि कंगनाच्या वकिलांनी त्याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलंय.

हृतिकने पोलिसांना दिलेले कंगनाचे मेल नक्की कुणी लीक केले याबाबत संभ्रम कायम आहे.मात्र, ही प्रकरणाची फक्त एक बाजू आहे. कंगनाची बाजू अजून जगासमोर यायचीये. त्यामुळे हृतिक कंगनाचा वाद आता अजून कोणत्या थराला जातो ते पहायचं…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा