असा झाला शाहरुखचा ‘गौरव’ !

April 23, 2016 6:05 PM0 commentsViews:

तुम्ही शाहरूख खानचा ‘फॅन’ सिनेमा पाहिलायत का ?, अफलातून गौरव आणि सुपरस्टार आर्यन खन्ना अशा या दोन्ही भूमिका शाहरुखने साकारल्या आहेत. आता डबल रोल म्हटल्यावर दोन्ही रोलमध्ये बदल तर असणारच…शाहरुखने या दोन्ही भूमिका साकारल्यात खर्‍या पण लूकसाठी व्हिएफक्स तंत्रज्ञानाने यात सिंहाचा वाटा उचललाय. कट्टर फॅन असलेला गौरव आणि सुपरस्टार आर्यन खन्ना वेगवेगळे कसे दिसतील यावर अधिक भर देण्यात आलाय. विशेष म्हणजे शाहरुख हा वर्षांचा आहे त्याला 25 वर्षांच्या गौरवच्या भूमिकेत अगदीच चपखलपणे बसवण्यात आलंय. ही किमया करून दाखवलीये हॉलीवूडचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ग्रेग कॅनोम यांनी. शाहरुखच्या चेहर्‍याची मांडणी पूर्णपणे बदलण्यात आलीये. त्यामुळे गौरव हा गौरव वाटतो आणि आर्यन खन्ना हा आर्यन खन्ना…पण आहे ते शाहरूखच….सौजन्य – यशराज फिल्मस


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा