कोलकात्याच्या आगीत 6 ठार

March 23, 2010 2:20 PM0 commentsViews:

23 मार्चकोलकात्याच्या पार्क स्ट्रीट भागात आज भीषण आग लागली. येथील प्रसिद्ध म्युझिक वर्ल्ड बिल्डिंगमध्ये लागलेल्या या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही येथे मदतकार्य सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या 15 गाड्या आणि 100 फायरमेन आग विझवण्याचे काम करत आहेत. शिवाय पार्क स्ट्रीट भाग नेहमी गजबजलेला असतो. एका लिफ्टमध्ये लागलेली ही आग इमारतीत पसरली. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

close