गंडा घालणार्‍या कंपन्यांच्या विरोधात पुण्यात मोर्चा

March 23, 2010 2:46 PM0 commentsViews: 3

23 मार्चआकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून सर्वसामान्य गुंतवणुकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणार्‍या बोगस कंपन्यांच्या विरोधात पुण्यात गुंतवणुकदारांनी मोर्चा काढला. बालगंधर्व रंगमंदिरापासून कलेक्टर कचेरीपर्यंत काढलेल्या या मोर्चात शेकडो गुंतवणुकदार सहभागी झाले. पुण्यातील श्री ओम साईनाथ कार ऍंड रेन्ट लिमिटेड, सिटी लिमोझिन, एम लिमोझिन,औरम रिऍलिटी लिमिटेड, मेट्रोक्रुज लिमिटेड आणि एसक्युब इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अशा 6 कंपन्यातील 30 ते 35 हजार गुंतवणुकदारांचे सुमारे दीड हजार कोटी रूपये अडकले असल्याचा दावा मोर्चेकर्‍यांनी केला. कंपनीतील काही कर्मचारी फरारी असून काहीजणांना अटक करण्यात आली आहे. पण कडक कारवाई अभावी आरोपी सुटतात आणि गुंतवणुकदारांचे पैसे बुडतात, असा आरोपही या गुंतवणुकदारांनी केला आहे.

close