रत्नागिरीत नौकासुंदरी स्पर्धा

March 23, 2010 2:50 PM0 commentsViews: 3

23 मार्चरत्नागिरीमधील पूर्णगड खाडीत एक अनोखी नौका सुंदरी स्पर्धा झाली. यामध्ये पूर्णगड खारवीवाडा आणि डोर्लेवाडी मच्छीमारांच्या 18 छोट्या यांत्रिकी नौकांनी भाग घेतला. विशेष म्हणजे सजवण्यात आलेल्या या सर्व नौकांवर सामाजिक समस्यांसंबंधी भाष्य करणारे हलते बोलते देखावे साकारण्यात आले होते. यामध्ये समुद्रमार्गाने येणारे अतिरेकी आणि त्यांचा पाठलाग करणारे पोलीस, दारुबंदीचे महत्व, शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका असा संदेश, जंगल तोडीला बंदी, रक्तदान, झाशीची राणी, असे वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले. मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक वेगळा आनंद देणारी ही स्पर्धा आणखी व्यापक करण्याचा मनोदय या निमित्ताने आयोजकांनी व्यक्त केला.

close