पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून त्याला वाचवायला हवं – मोदी

April 24, 2016 11:54 AM0 commentsViews:

modi man ki baat
24 एप्रिल :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जमन की बातत कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केलं. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून त्याला वाचवा असं आवाहनही पंतप्रधानांनी आज केलं.

पावसाचं पाणी वाचवून सुद्धा दुष्काळाच्या संकटावर मात करता येऊ शकतं. यासाठी सर्वांनी पावसाचं पाणी साठवण्यासाठी आपल्या घरांच्या खाली टाक्या तयार करायला हव्यात. यामुळे पडणारे पाणी या टाक्यांत साठवलं जाऊन पाण्याची बचत होईल. गावांमध्ये पाण्याचं संवर्धन आणि साठवण करणं आवश्यक आहे. आपण यासाठी अभियान सुरू केले पाहिजे, असं मोदी म्हणाले.

तसंच सरकारच्या अनेक योजना यशस्वी होत असल्याचंही ते म्हणाले. देशातील जनतेने उस्फूर्तपणे गॅस सबसिडी सोडल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आतापर्यंत 1 कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याचे त्यांनी म्हटलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा