न्यायव्यवस्थेवरील वाढत्या तणावावर बोलताना सरन्यायाधीशांना अश्रू अनावर

April 24, 2016 5:08 PM0 commentsViews:

dsada

24  एप्रिल : न्यायव्यवस्थेवरील वाढत्या तणाव यावर आज (रविवारी) एका कार्यक्रमात बोलत असताना भारताचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. देशाच्या न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या कमतरतेचा उल्लेख त्यांनी केला. आम्ही किती तणावात काम करतो हे लोकांना सहज लक्षातच येत नसल्याचं ते म्हणाले.


ते म्हणाले, खटल्यांची वाढती संख्या पाहता, न्यायाधीशांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ व्हायला हवी. वारंवार मागणी करूनही अनेक सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. खटल्यांच्या वाढत्या संख्येसाठी केवळ कोर्टाला जबाबदार ठरवू नका. एफडीआय, मेक इन इंडिया इतकीच न्यायाधीशांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतात न्यायव्यवस्था कशी चालते याबद्दल परदेशातील न्यायाधीशांना आश्चर्य वाटतं. भारतात एक न्यायाधीश सरासरी 2600 प्रकरणे हाताळतो तर अमेरिकेत हेच प्रमाण 81 आहे असं ठाकूर यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा