पुणेकरांनी अनुभवला स्वयंभू बॉडीबिल्डिंग स्पर्धा थरार

April 24, 2016 3:54 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे

पुण्यात नुकतीच स्वयंभू बॉडीबिल्डिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातले बॉडीबिल्डर्स सहभागी झाले होते. तर जवळपास 10 हजार पुणेकरांनी स्पर्धेला उपस्थिती लावली होती. पण स्पर्धेचं मुख्य आकर्षण ठरले ते अपंग बॉडीबिल्डर्स… परिस्थितीवर मात करून यांनी जे शरीर कमवलंय, त्याला सलामच. कुणाला पोलिओ आहे, तर कुणी कृत्रिम पाय लावतं पण उत्साह आणि इच्छाशक्ती तेवढीच..

body building pune
हा बॉडीबिल्डर्सचा मेळा भरलाय तो पुण्यात… एकाहून एक सरस बॉडीबिल्डर… प्रत्येकाच्या स्टेजवरच्या आगमनाबरोबर टाळ्या… पण सर्वाधिक टाळ्या पडल्या हे बॉडीबिल्डर्स आल्याबरोबर कारण हे आहेत अपंग बॉडीबिल्डर्स. 14 दिव्यांग शरीरसौष्ठपटूंचे आगमन मंचावर होताच उपस्थितांनी मानवंदना दिली. ज्यांना स्वताच्या पायांवर नीटपणे उभेही रहाता येत नव्हते, चालताही येत नव्हते. अशा अपंग खेळाडूंची पीळदार देहयष्टी पाहून प्रेक्षकही स्तिमीत झाले. एकाचवेळी मंचावर चौदाही खेळाडू आले. यात कुणाचा एक पाय स्टील रॉडचा होता तर एकाने कृत्रिम पाय बसवला होता. चार खेळाडूंचे तर दोन्ही पाय पोलियोग्रस्त होते. काहींचे एक पाय पूर्णपणे पोलिओचे बळी ठरले होते तर एकाच्या दोन्ही पायांच्या गुडघ्याला वाटीच नव्हती. अशा खेळाडूंच्या जिगरबाज वृत्तीला पुणेकरांनी भरभरून दाद दिली. इथे या स्पर्धेतही बाजी मारली ती दिव्यांग गटाचा मि. इंडिया ठरलेल्या दिपंकर सरकारने. त्यानेच लाखमोलाच्या दिव्यांग स्वयंभू श्रीचा मान मिळविला. बंगालचा गोपाल साहा दुसरा आला. महाराष्ट्राचे इंद्र प्रकाश राव आणि सागर चौहान क्रमशा चौथे आणि पाचवे आले.

या स्पर्धेची मुख्यफेरीही तितकीच दमदार, स्पर्धाही तितकीच चुरसीची. दिग्गजांमध्ये जबरदस्त स्पर्धा होती. प्रत्येक पोजिंगसह स्पर्धेतली चुरस आणि उत्कुटता वाढत होती. पण अखेर बाजी मारली ती तमीळनाडूच्या रामचंद्रनी. सर्वांना पिछाडत रामचंद्रन अव्वल ठरला.त्यानं सहा लाखांच बक्षिस पटकावल. 2013लमध्ये हंगेरी येथे झालेल्या मि.वर्ल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर गेली दोन वर्षे विश्रांती करणार्‍या राजेंद्रनने जबरदस्त कमबॅक केले. त्याने रेल्वेच्या किरण पाटीलवर मात करीत स्वयंभू श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. जगदीश लाडला चौथ्या स्थानावर समाधान मानाव लागलं. बॉडीबिल्डर्सनी घेतलेली मेहनत त्यांनी कमावलेल शरीर बघून सारेच थक्क झाले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती अपंग बॉडीबिल्डर्सची. अनेकांना हे बॉडीबिल्डर्स व्यायाम करण्याची प्रेरणा देऊन गेले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा