‘आयबीएन-लोकमत’ची बाजी

March 20, 2010 3:28 PM0 commentsViews: 59

20 मार्चमटा सन्मान 2010 पुरस्कार जाहीर झालेत. या पुरस्कारांमध्ये 'आयबीएन-लोकमत'ने बाजी मारली आहे. मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वोकृष्ट संकल्पनेसह सर्वाधिक 6 पुरस्कार 'आयबीएन-लोकमत'ने पटकावले आहेत. 'अचूक बातमी ठाम मत' हे ब्रीदवाक्य घेऊन 'आयबीएन-लोकमत' आजपर्यंत सत्याची कास धरून वाटचाल करत आहे. त्याचाच गौरव मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात झाला. विक्रमी पुरस्कार पटकावत 'आयबीएन-लोकमत'ने न्यूज चॅनेलमध्ये बाजी मारली…कथाबाह्य मालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधाराचा पुरस्कार वसुंधरा काशीकर हिला सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी मिळाला. दररोज सकाळी आठ वाजता सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या विविध घडामोडींचा आढावा आम्ही घेतो. या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचा पुरस्कारही मिळाला.वृत्तमालिकेसाठी सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधाराचा पुरस्कार रेणुका रामचंद्रन हिला महाराष्ट्रनामा या कार्यक्रमासाठी मिळाला. यात आम्ही राज्यातल्या विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बातम्यांचा वेध घेतो. वृत्तमालिकेसाठी सर्वोत्कृष्ट पुरुष म्हणून अमोल परचुरे याला नाटक-बिटक या कार्यक्रमासाठी हा पुरस्कार मिळाला. खास रंगभूमीरवच्या वेधक आणि वेचक घडामोडींवर आधारित असलेला न्यूज चॅनेलमधला हा खास कार्यक्रम आहे. सर्वोत्कृष्ट वृत्तविषयक कार्यक्रम म्हणून खास निवडणुकी दरम्यान सुरु केलेल्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाला हा पुरस्कार मिळालाय. या कार्यक्रमाचा अँकर अमोल परचुरे, तर प्रोड्युसर होते सुहास गटवई… डेस्कवरून या कार्यक्रमाचा समन्वय अमित मोडक याने साधला. तसेच याच कार्यक्रमातून मनिष अंजर्लेकर यानेही सुपरमॅन बनून धमाल उडवली होती. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बेस्टच्या टीमचाही यात मोलाचा हातभार होता. जनतेचे प्रश्न समजून घेऊन आम्ही लोकांच्या अडचणी राज्यपालांपुढे मांडल्या होत्या. सर्वोत्कृष्ट युवा कार्यक्रम म्हणून टेक गुरु ला पुरस्कार मिळालाय. नवनव्या संकल्पना आणि तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारा हा एक खास कार्यक्रम आहे. अंकित वेंगुर्लेकर, गौरी कदम आणि अमृता दुर्वे या टीमने हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.विश्वासार्ह बातम्या देणार्‍या 'आयबीएन-लोकमत' ला प्रेक्षकांनी सतत प्रतिसाद दिला आहे. आणि याच प्रेक्षकांच्या पाठबळावर आम्ही म्हणत आहोत, चला जग जिंकूया!

close