कन्हैया कुमारच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

April 24, 2016 6:44 PM0 commentsViews:

नाशिक – 24 एप्रिल :   कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसंच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक इथला कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला.

युती आहे काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही.भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. परंतु तोही मुद्दा आता मागे पडत असेल तर भाजपसोबत युती करणार नाही. भविष्यात युती करायची की नाही हे कार्यकर्ते ठरवतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav on MeatBan

दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजूटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि मित्राला सावध केलं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सर्व विभागांत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. त्याची सुरुवात नाशिकमधून झाली. काही दिवसांपूर्वी भाजपनंही नाशिकमध्येच मेळावा घेतला होता. त्यामुळे येत्या काळात होणार्‍या महापालिका निवडणुका आणि सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांमधला तणाव यावेळी उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून दिसून आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा