मोदीजी, ‘मन की बात’ मध्ये कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला – कन्हैया कुमार

April 24, 2016 8:57 PM0 commentsViews:

पुणे – 24 एप्रिल : मोदीजी ‘मन की बात’मधून मराठवाड्यातील शेतकर्‍यांबद्दल, दिल्लीत आणि धारावीत झोपडपट्टीत राहणार्‍यांबद्दलही बोला, असा टोला लगावत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने आज (रविवारी) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पुरोगामी विद्यार्थी संयुक्त समितीतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैया कुमारच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे पाऊण तासाच्या भाषणामध्ये कन्हैयाने नरेंद्र मोदी, रामदेव बाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिदुत्त्ववादी संघटनावर जोदार टीका केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदार जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, मेधा पानसरे, अमोल पालेकर, संध्या गोखले, भालचंद्र कांगो आदी नेते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रंगमंदिराच्या परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. या परिसराला छावणीचेच स्वरुप आले होते.

एक रोहित गेला तर अनेक रोहित जन्माला येतील. पण ते आता मरणार नाहीत. समाजात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटनेला विविध रंग दिले जातात. सगळ्यांना समानतेचा हक्क मिळावा, यासाठीच आमची लढाई सुरू आहे. आम्ही कोणत्याही जुमलेबाजीबद्दल बोलत नाही, आमच्याकडे विकासाचा कार्यक्रमही तयार आहे. देशभरात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍यांना कायम केलं पाहिजे. एकाच स्वरुपाचे काम करणार्‍या दोन व्यक्तींमध्ये दुजाभाव का, हा आमचा प्रश्न आहे. जर कंत्राटी पद्धतीने काम हाच उपाय असेल, तर मग संसदेचंही कंत्राटीकरण करणारा आहात का, असा प्रश्न कन्हैयाने यावेळी उपस्थित केला.

ÛúÖê»ÖêÖêËÝÖÖêê¯ÖË

कोणताही प्रश्न उपस्थित केला की सरकार गोमाता, भारतमातेचा मुद्दा निर्माण करताता. आम्हाला कोणत्याही मातेविषयी आक्षेप नाही. मात्र काय वाटत असेल त्या आईला जिचा मुलगा शिक्षणासाठी गेला आणि पंख्याला लटकला? काय वाटत असेला त्या मातेला की जिच्या मुलीचं पोट फाटून तिच्यावर बलात्कार झाला? या मातांचाही विचार व्हायाला हवा, असे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित करत कन्हैया कुमारने केंद्र सरकारच्या कारभारावर शंका उपस्थित केल्या आहेत.

आम्हाला जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल, तितके आम्ही आणखी उफाळून वर येऊ. मोदी तर पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे सत्ता आहे. पण मग त्यांना आम्ही आमचे विचार मांडले तर इतकी भीती का वाटते. तुमच्या हल्ल्यांनी आम्ही कधीच घाबरणार नाही. एक रोहित वेमुला गेल्यानंतर आता आणखी कोणी जाणार नाही. समाजात असंख्य रोहित तयार होत राहतील. माझ्यावर हल्ला करणारे आमचे साथीच आहेत. पण त्यांची माथी भडकवली जात आहेत, असंही कन्हैया म्हणाला.

देशातील जातीव्यवस्थेला, गरिबीला विरोध केला तर तुमच्या पोटात का दुखते. मोदींचा विरोध केला तर देशाचा आपमान, संघाला विरोध म्हणजे संसदेचा आपमान आणि मनुस्मृतीविरोधात बोलले की संविधानाचा आपमान कसा होऊ शकतो, असा प्रश्नही कन्हैयाने यावेळी उपस्थित केला. तसंच तुम्ही नुसती नाव बदला आम्ही समाज बदलण्यासाठी आलो आहोत, असं आवाहन ही त्याने दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा