राष्ट्रपतींना जीवे मारण्याची धमकी

October 12, 2008 2:12 PM0 commentsViews: 9

12 ऑक्टोबर, पुणेराष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी पुण्यात आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना जीवे मारण्याची धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. राज्य प्रशासनाला ही माहिती मिळाली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शुक्रवारपासून राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुणे दौर्‍यावर आहेत. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे पोलिसांनी सर्तकता बाळगली आहे. राष्टपतींसाठी असलेल्या सुरक्षेच्या ताफ्यात वाढ करण्यात आली आहे.

close