सत्तार प्रकरणाला नवे वळण

March 24, 2010 8:27 AM0 commentsViews: 5

24 मार्चकाँग्रेसचे मारहाणफेम राज्यमंत्री अब्दुल सत्तार, यांना वाचवण्याचा प्रयत्न आता औरंगाबाद पोलीस करत आहेत, असा संशय आता निर्माण होत आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्ता मुश्ताक यांना मारहाण केली होती. कालपर्यंत त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता मुश्ताककडून पोलिसांनी एक विनंती अर्ज लिहून घेतला आहे.'' घटनास्थळी मी पाय घसरुन पडलो माझी कुणाविरुध्द तक्रार नाही'', अशी धक्कादायक कबुली या विनंती या अर्जात मुश्ताक यांनी दिली आहे. या अर्जाच्या आधारेच पोलिसांनी सत्तार यांना वाचवण्यासाठी, राज्याच्या गृहखात्याला दिशाभूल करणारा अहवाल पाठवला आहे.

close