केंद्राचं राज्याकडे लक्ष, मोदींनी दुष्काळ दौरा करण्याची गरज नाही -मुख्यमंत्री

April 25, 2016 9:28 AM2 commentsViews:

25 एप्रिल : राज्यातल्या दुष्काळाकडे आधी कधी नव्हतं तेवढं केंद्र सरकारचं लक्ष आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्र्यांनी दुष्काळ दौरा करण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट करत कन्हैया कुमारला प्रत्युत्तर दिलं. ते दिल्लीत बोलत होते.

cm_on_kanhiyakumarमोदींना परदेशात जायला वेळ आहे पण त्यांनी मराठवाडा दौरा केला नाही, अशी टीका कन्हैया कुमारनं शनिवारी केली होती. त्याच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील दुष्काळाकडे पूर्वी कधीही नव्हते एवढ्या संवेदनशीलतेने केंद्र सरकारचे लक्ष असल्याने पंतप्रधान किंवा कोणाही केंद्रीय मंत्र्याने राज्याचा दुष्काळी दौरा करण्याची आवश्यकता नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कन्हैया कुमारावर पलटवार केला. तसंच दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर प्रभावी कामगिरी करीत आहे. केंद्रातील मोदी सरकारची त्याला पूर्ण मदत आहे. महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरकारने सुरेश प्रभू आणि पियूष गोयल या दोन केंद्रीय मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. अपेक्षित वेळेपूर्वीच लातूरला वॉटर ट्रेन पोहोचली हा त्याचाच परिणाम. याखेरीज दुष्काळात राज्याला आर्थिक आणि वाढीव मदतीसाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव सातत्याने लक्ष ठेवून आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Aanand P

    Prattek wayfal aaropache uttaar deun tyala yewadhe mahatwa ka det aahat apan saheb. jantela mahit aahe kon hitache aahet te.

  • Aanand P

    comment cut keli distey.