भुजबळांच्या प्रकृतीत सुधारणा, डिस्चार्जनंतर पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

April 25, 2016 9:38 AM0 commentsViews:

Chagan bhujbal213मुंबई-25 एप्रिल : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर दंतचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात त्यांची तपासणी केली जाणार आहे. दाताचे उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात येणार आहे, असं सेंट जॉर्ज रुग्णालयातून सांगण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना 18 एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब 180-120 इतका होता. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले, पण अजूनही दातांचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळेच सोमवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात भुजबळ यांच्या दातांचा एक्सरे काढला जाणार असून, पुढील उपचार करण्यात येणार आहेत, असं डॉ. सिक्वेरा यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा