वेगळ्या विदर्भासाठी हिंसा झाल्यास जबाबदार नाही, श्रीहरी अणेंचा इशारा

April 25, 2016 9:54 AM0 commentsViews:

Aney12325 एप्रिल : विदर्भाच्या आंदोलनात हिंसेची शक्यता नाकारता येत नाही विदर्भाच्या चळवळीतून हिंसा घडली तर आम्ही जबाबदार नाही असा इशारा विदर्भवादी नेते ऍड श्रीहरी अणे यांनी विदर्भाच्या चळवळीला विरोध करणार्‍या शिवसेनेला दिला आहे.

वेगळ्या विदर्भासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनादरम्यान हल्ले होत आहेत अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडू नये असंही अणे म्हणाले. विदर्भाच्या आंदोलनासाठी रास्ता रोको, रेल रोको आणि वीज रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याची जी काही किंमत मोजावी लागेल ती आम्ही द्यायला तयार आहोत असंही अणे म्हणाले. याआधीही अणेंनी वेगळ्या विदर्भासाठी महाराष्ट्रातून केक कटिंग केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा अणेंनी बेजाबदारपणे इशारा दिलाय. त्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा