पाण्याच्या शोधात मोराचा दुर्दैवी मृत्यू

April 25, 2016 10:51 AM0 commentsViews:

बुलडाणा – 25 एप्रिल : दुष्काळाने आपलं उग्र रूप दाखवायला सुरूवात केलीये. माणसांबरोबरच पशुपक्ष्यांनाही त्याचे चटके बसत आहेत. बुलडाण्यात खामगाव वन परिक्षेत्रात येणार्‍या पहुरजीरा गावात थेंबभर पाण्यासाठी जागोजाग भटकताना एका मोराचा मृत्यू झालाय.mor_buldhana

भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हटल्या जाणार्‍या या राजबिंड्या पक्ष्याच्या अशा मृत्यूमुळे या भागातल्या पाणीटंचाईकडे नव्याने लक्ष वेधलं गेलं आहे. आरक्षित वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणीपाणवठे तयार करून या वन्य प्राणी आणि पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं ही जबाबदारी वनविभागाची असते. मात्र, याकडे वनविभागाचे पुर्णतः दुर्लक्ष असलेले पहायला मिळतं. पिण्याचे पाणी मोराला मिळाले नसल्याने मोराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलीये आणि याची जबाबदारी ही कोणाची हाही एक मोठा प्रश्नच निर्माण झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा