मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, मित्रपक्षांची नाराजी होणार दूर ?

April 25, 2016 12:44 PM0 commentsViews:

मुंबई – 25 एप्रिल : गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहे. अतिरिक्त खात्यांचा भार सांभाळणार्‍या मंत्र्यांचा भार हलका केला जाणार आहे. तसंच सत्ता स्थापनेपासून नाराज असलेल्या मित्रपक्षांच्या पारड्यात काही तरी पडण्याची शक्यता आहे.CM Deven

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्ताराबद्दल विचार केला जाईल असं स्पष्ट केलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपले असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेतही दिले आहे. पण, नेमका विस्तार कधी होणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

पण, मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त कारभार सोपण्यात आलाय. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि खुद्द मुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त पदांच्या जबाबदार्‍या आहेत. त्यामुळे अतिरिक्त पदाचा भार हलका केला जाण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिवसेनेशी चर्चा करण्यात येणार आहे. जर शिवसेना विस्ताराला तयार नसेल तर भाजपच्या खात्यातल्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सत्ता स्थापनेसाठी मदत करणार्‍या मित्रपक्षांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले. पण, अजूनही कोणतीही जबाबदारी मित्रपक्षातील नेत्यांवर सोपवण्यात आली नाही. त्यामुळे या विस्तारात मित्रपक्षांनाही  सहभागी करून घेण्याची दाट शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा