‘तो’ फोटो भुजबळांचाच !

April 25, 2016 1:10 PM0 commentsViews:

25 एप्रिल : छगन भुजबळांचा व्हिल चेअरवर बसलेला एक फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता..पण तो फोटो छगन भुजबळांचाच आहे किंवा नाही यावर बरीच चर्चा सुरू होती..पण आता सूत्रांच्या माहितीनुसार तो फोटो भुजबळांचाच असल्याचं समजतंय.bhujbal3

फोटोत भुजबळांची दाढी वाढलेली आहे. मान खाली घालून बसलेले भुजबळ अतिशय थकलेले असल्याचं या फोटोत जाणवतंय त्यांचं वजनही तब्बल 10 किलोंनी घटल्याचं समजतंय. मागील आठवड्यात सोमवारी छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना ऑर्थर रोड जेलमधून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर हा त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून छगन भुजबळांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा