साहित्य संमेलनाचा नवा पेच

March 24, 2010 8:41 AM0 commentsViews: 2

24 मार्चपुणे इथे होणार्‍या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांना सूत्र प्रदान करण्याचा मुद्दा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. संमेलनाच्या अध्यक्षांकडूनच नवनिर्वाचित अध्यक्ष सूत्र स्वीकारण्याची घटनात्मक तरतूद आहे. पण मागील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कुलकर्णी यांच्याकडे सूत्रे सुपूर्द करावीत, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळाच्या गुरुवारी पुण्यात होणार्‍या बैठकीत याबाबतचा ठराव मांडला जाणार आहे.

close