आयसिसमध्ये 30 भारतीयांना सामील करणार मोहम्मद शफी अरमार ठार

April 25, 2016 2:51 PM0 commentsViews:

25 एप्रिल : आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतीय तरुणांची भरती करणारा मोहम्मद शफी अरमार याला ठार करण्यात आलं आहे. सीरियात अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात शफीचा खात्मा झाल्याचं कळतं.mohamad_isis

26 वर्षीय मोहम्मद शफी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावचा रहिवासी आहे. भारतातील तरुणांनी आयसिसमध्ये भरती करण्याचं महत्त्वाचं काम शफीकडे होतं. त्याने सुमारे 30 तरुणांना आयसिसमध्ये भरती केल्याचं समजतंय. मोहम्मद शफी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या संपर्कात होता. फेसबुक ग्रुप आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याने 600 ते 700 तरुणांशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर तरुणांची भरती करण्यासाठी त्याने ऑनलाईन ट्रान्सफर आणि हवालामार्फत फंड जमा केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा