भीक मागण्यापेक्षा डान्सबारमध्ये काम करणं चांगलं – सुप्रीम कोर्ट

April 25, 2016 3:21 PM0 commentsViews:

dancebar

25 एप्रिल :  रस्त्यावर उभं राहून भीक मागण्यापेक्षा डान्सबारमध्ये काम करणं चांगलं असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला डान्स बारच्या मुद्यावरून पुन्हा एकदा फटकारलं आहे. डान्स बार पुन्हा सुरु करण्यासाठी बंदी करू नका. अश्लीलता रोखण्यासाठी नियम लागू करु शकता असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राज्य सरकारनं काही अट घालत डान्स बार सुरु करण्याची परवानगी दिली होती. त्यासंदर्भाच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं हे मत व्यक्त केलं आहे.

गेल्या सुनावणीत राज्य सरकारने आदेशाचं पालन न केल्याने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजाणी का केली जात नाही ? असा सवाल राज्य सरकारला विचारला होता. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला याप्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा