सी लिंकच्या दुसर्‍या टप्प्याचे आज उद् घाटन

March 24, 2010 8:54 AM0 commentsViews: 4

24 मार्चमुंबईचा नवा लँडमार्क ठरलेला सी लिंकच्या दुसर्‍या फेजचे आज उद् घाटन होत आहे. या उद् घाटनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन उपस्थित राहणार आहेत.सध्या सी लिंकच्या एका फेजवरुनच वाहतूक सुरू आहे. उत्तरेकडील दुसरी फेज सुरू झाल्यानंतर वाहतूक अधिक जलद गतीने सुरू होईल. संपूर्ण सी लिंक साडेचार किलोमीटर लांबीचा आहे. सी लिंक बांधून पूर्ण झाल्यामुळे आठ पदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या नवीन चार लेनवरुन वरळीहून बांद्र्याकडे वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तर याआधी सुरू करण्यात आलेल्या चार लेन या बांद्र्याहून वरळीच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.

close