फोटो नाही,ही तर रांगोळी !

April 25, 2016 3:46 PM0 commentsViews:

25 एप्रिल :वसईमध्ये चंडिका देवीचा यात्रा उत्साहात सुरू आहे. या यात्रेनिमित्त रांगोळीचं प्रदर्शन ठेवण्यात आलंय. या वेळी रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्यात आलेत. वसई तालुक्यातल्या डोंगरावर 400 फूट उंच पुरातन पांडवकालीन गुंफेमध्ये हे चंडिकादेवीचं मंदिर आहे. तीथं दर वर्षी ही यात्रा भरते. चंडिका देवीची ही यात्रा तीन दिवस चालते. देशभरातून भाविक या यात्रेला येत असतात. तर तीन दिवसांमध्ये कुस्त्यांचे फडही ठेवले जाताहेत. त्यामध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून पैलवान येतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा