छगन भुजबळांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

April 25, 2016 7:31 PM0 commentsViews:

 

मुंबई – 25 एप्रिल :  महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सेंट जार्ज हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर त्यांची रवानगी पुन्हा एकदा ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. छातीत दुखत असल्याच्या कारणावरून त्यांना गेल्या सोमवारी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, आज जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा व्हिलचेअरवर बाहेर आणण्यात आलं, त्यावेळी हेच का ते भुजबळ असं म्हणण्याची वेळ आली.

bhujbal discharge

यापुर्वी सोशल मीडियावरुन त्यांचा खुर्चीवर बसलेला एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोत असलेली व्यक्ती खरंच भुजबळ आहेत का ?, ही देखील चर्चा झाली होती. पण, हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर भुजबळांची स्थिती पाहिल्यावर तो फोटो खरा असल्यावर शिक्कामोर्तब झालं. कारण, डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि फुफुस्सांच्या आजारामुळे त्यांचं वजन 10 किलोनं कमी झालं आहे. भुजबळ थकलेले दिसत होते. त्यांची दाढी वाढली होती. दाढीचे सगळे केस पांढरे झालेले दिसत होते. कायम ‘मी भुजबळ’ असं म्हणून सभा गाजवणारे भुजबळ प्रकृती अस्वस्थ्यामुळे खचलेले दिसले. रुग्णालयाच्या पायर्‍या उतरतानाही त्यांना पोलिसांचा आधार घ्यावा लागत होता.

त्याच्या या आजारपणामुळे त्यांना तुरुंगात उपचासाठी काही वैद्यकीय मशीन्स वापरण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. उपचारानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा