1 मेपासून लातूरमधून सुरू होणार जलसंचयन सत्याग्रह आंदोलन

April 25, 2016 5:48 PM0 commentsViews:

राजेंद्र हुंजे, उमरगा, उस्मानाबाद – 25 एप्रिल : उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा या गावात वॉटर बँक बनवण्यात आली आहे. येत्या 1 मे रोजी लातूरमध्ये जलसंचयन सत्याग्रहाचं आंदोलन केलं जाणार आहे. तसंच पाण्याचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी देखील होऊ लागली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असताना वॉटर बँकेचं महत्त्व सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट.

ŸÖ†ÖêæÆüß
पाईपमधून कोसळणारं पाणी बघितलं की, 40-45 डिग्री तापमानातही दुष्काळाचा दाह अगदी सुसह्य वाटायला लागतो. उमरगा तालुक्यातल्या कवठा या गावात सेवाग्राम संस्थेच्या वतीने ही वॉटर बँक उभारण्यात आली आहे. त्यातून पाण्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं जात.

या वॉटर बँकेच्या बाजूला 4 सौर पॅनेल उभे करण्यात आले आहेत. याच सौर ऊर्जेचा येथे वापर केला जातो. त्यामुळं विजेची बचतही होते. जवळच असलेल्या एका बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसून इथं आणलं जात. सध्या वॉटर बँकेत 3 कोटी लिटर पाण्याचा साठा आहे. यातलंच 25 लाख लिटर पाणी टँकरने लातूरला दिलं जाणार आहे. शिवाय पाण्याचे असं विकेंदि्रत साठे तयार व्हावेत अशी मागणीही होऊ लागली आहे.

गावोगावी पाण्याचा जागर करून असे पाण्याचे साठे सगळ्यांनी मिळून तयार केले तर पाणी टंचाईच नाही तर, दुष्काळला सुद्धा रोखण्यासाठी याची मोठी मदत होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा