किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स

March 24, 2010 10:32 AM0 commentsViews: 1

24 मार्चआयपीएलमध्ये आज मॅच रंगणार आहे, ती पॉईंट टेबलमधील तळाच्या दोन टीम्समध्ये. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या टीम एकमेकांना भिडणार आहेत.पंजाबच्या टीमने मागच्याच मॅचमध्ये चेन्नई टीमला सुपर ओव्हरमध्ये हरवून पॉईंट्सचे खाते उघडले आहे. तर राजस्थान टीमनेही कोलकाता टीमला हरवून पहिले पॉईंट्स मिळवले आहेत. दोन्ही टीम्सना चार मॅचेस पैकी फक्त एक मॅच जिंकता आली आहे. कागदावर पंजाबची बॅटिंग सरस वाटत असली आणि घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा त्यांना मिळणार असला, तरी राजस्थान टीमही कोलकाता विरुद्धच्या विजयामुळे फॉर्ममध्ये आली आहे. रात्री आठ वाजता मोहालीत ही मॅच होणार आहे.

close