भाजपला मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे वेध, मुख्यमंत्री 30 एप्रिलला फोडणार प्रचाराचा नारळ ?

April 26, 2016 8:54 AM0 commentsViews:

मुंबई – 26 एप्रिल : शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता काबीज केलेल्या भाजपने आता मुंबईकडे मोर्चा वळवलाय. येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 मे पासून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहे. 30 एप्रिलच्या मध्यरात्री मुख्यमंत्री प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचं कळतंय.cm_on_st_workers

विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं. आता भाजप मुंबई महापालिकेसाठी आतापासूनच तयारी लागली आहे. 1 मेपासून भाजप पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. 30 एप्रिलच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मुंबई विमानतळावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं कळतंय. मुंबई भाजपचे नेते प्रत्येक वॉर्डात 2 ते 3 कार्यक्रम घेणार आहे. दिंडी, शोभायात्रा आणि पदयात्राही काढण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि केलेल्या कामांचं ब्रँडिंग मोठ्या प्रमाणात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा