मेळाव्याला आला नाही म्हणून निलेश राणेंची कार्यकर्त्याला बेदम मारहाण

April 26, 2016 9:15 AM0 commentsViews:

26 एप्रिल : मेळाव्याला उपस्थित राहिला नाही म्हणून माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप सावंत यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. फक्त सुदैव म्हणून आपले प्राण वाचल्याचे संदीप सावंत यांनी आरोप केलाय.  आपली आई आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला न गेल्याने आपले अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. या प्रकरणी निलेश राणेंविरोधात ठाणे  पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

nilesh_rane33संदीप शिवराम सावंत हा काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता. जवळपास 10 ते 12 वर्षांपूर्वीपासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असल्याने त्यांना चिपळूण तालुका अध्यक्षपदी नेमण्यात आलं. चिपळूण येथे मराठा महासंघ आरक्षण यांचा मेळावा होता. ज्यासाठी काँग्रेस चे माजी खासदार निलेश राणे आले होते. संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्याने जाऊ शकले नाहीत ज्याचा राग मनात धरून निलेश राणे यांनी आपल्या समर्थाकांसोबत सावंत यांचे घर गाठले आणि आपल्याला काही बोलायचे आहे असं सांगून खाली नेले खाली नेऊन राणे यांनी सावंत यांच्या कानाखाली मारत गाडीत कोंबले. रात्रभर मारहाण करत मुंबईला आणले असा आरोप सावंत यांनी राणे यांच्यावर केलाय.

मुंबईत देखील त्यांना एका खोलीत कोंडून लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, बांबू अशा वस्तूंनी मारहाण केली. ज्यात सावंत यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. शरीरावर देखील जागोजागी मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. आपल्या पतीचा रात्रभर शोध घेऊन देखील त्यांची काहीच खबर न मिळाल्याने सावंत यांच्या पत्नी शिवानी यांनी नारायण राणे यांचे दुसरे पुत्र आमदार नितेश राणे आणि शेवटी त्यांच्या पत्नी नीलम राणे यांना फोन करून घडला प्रकार सांगितला.

नीलम राणे यांनी माहिती घेऊन सावंत यांना त्यांचे जोगेश्वरी येथे राहणारे मेव्हणे दीपक कदम यांच्या घरी पहाटे 5 वाजता सोडल्याचं सांगितलंय. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखळ झाल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगत ते ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात भर्ती झाले आहेत. आपल्याला नारायण राणे यांनी एकदा येऊन भेटावे आणि एका शुल्लक कारणावरून सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था केली आहे ते आपण मरण्यापूर्वी येऊन पाहावं अशी इच्छा सावंत यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या पतीने गेली अनेक वर्षे खस्ता खाऊन काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे तरीही त्यांना हि शिक्षा का भोगावी लागत आहे अशी विचारणा त्यांची पत्नी शिवानी करीत आहेत. आपण नीलम राणे यांना फोन केल्यानंच आपल्या पतीचे प्राण वाचले अन्यथा काहीही अनर्थ घडला असता असा आरोप केलाय. तर आपल्या वडिलांना निलेश राणे यांनीच बोलावून नेऊन मारहाण केल्याचं सावंत यांचा मुलगा चिराग याने सांगितलं. निलेश राणे यांनी सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या कानफाडीत मारली असं चिराग यानं सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा