मुंबईत रस्ते कामात 50 टक्के अनियमितता, कंत्राटदारांवर कारवाई होणार

April 26, 2016 9:31 AM0 commentsViews:

mumbai_#मुंबई – 26 एप्रिल : मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यात महापौर स्नेहल आंबेकरांना आयुक्त अजॉय मेहता यांनी रस्ते कामाबाबत असलेल्या अनियमिततेच्या चौकशीचा अहवाल दिलाय. या रस्ते कामात 50 टक्के अनियमितता आढळली आहे. याप्रकरणी अनेक बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी रस्ते विभागाचे मुख्य अभियंता रोड अशोक पवार यांना निलंबित केलं जाणार आहे. तसंच, प्रशासनातले बडे मासेही जाळ्यात अडकणार आहेत. याप्रकरणी 6-7 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. थर्ड पार्टी ऑडीट करणाऱ्या कंपन्यांवरही गुन्हे दाखल होणार आहे. हा अहवाल 34 रस्त्यांची पहाणी करुन सादर करण्यात आलाय. सरासरी 48-50 टक्के पर्यंत कामात अनियमितता आढळून आलीय. विशेष म्हणजे, रस्ते घोटाळ्याचा अहवाल शिवसेनेनं प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. तसंच, या अहवालासाठी वारंवार महापौरांकडून पत्रव्यव्हार करुनही अहवाल सादर होत नव्हता. त्यामुळेच अहवाल सादर झाला नाही तर आयुक्तांवर अविश्वास ठराव आणू असंही महापौरांनी म्हटलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा