युती सांभाळली तर 5 वर्षं सहज निघतील, जोशींनी दिला होता सल्ला -मुख्यमंत्री

April 26, 2016 10:10 AM0 commentsViews:

मुंबई- 26 एप्रिल : युुती सांभाळली तर पाच वर्षं सहज निघतात, असा सल्ला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर कार्यक्रमात हे गुपित उघड केलंय. राम नाईक यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हे उघड केलंय. मलाही युतीचं महत्त्व मान्य आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.cm_on_joshi

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, मी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या अनुभवाचा सल्ला दिला. युती सांभाळली तर पाच वर्ष सत्ता सांभाळता येईल असा किस्सा सांगितला. मुख्यमंत्री होणं हे कठीण असतं. शेकडो लोकं यासाठी प्रयत्न करता. हे पद मिळवण्यासाठी फार मोठ नशिब लागतं. आपण या कठीण परिस्थिती मुख्यमंत्री झालाय. मला विश्वास आहे या पदावर इतिहासात तुमचं नावं कायम घेतलं जाईल अशी स्तुतीसुमनं मनोहर जोशी यांनी उधळली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा